मुंबई पोलीस आयुक्त बदनामी प्रकरण दोन गुन्हे दाखल

0 49

मुंबई- एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टतनंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण पुन्हा एखदा चर्चेत आलं आहे. या रिपोर्टवर भूमिका मांडताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांचं खच्चीकरण आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असं म्हटलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं समोर आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलनं आता पर्यंत दोन गुन्हे दाखल केले आहेत.

सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती देताना पुढे संगिलते “ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील अनेक अकाऊंटधारकांवर आणि फेक अकाऊंटस् विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच त्यांच्या आणि पोलिसांविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोविडच्या संकटात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असं असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली.

Related Posts
1 of 1,371

त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली आहे आणि सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: