मुंबई पोलीसला माझा सल्युट – भारत गणेशपुरे

मुंबई- एकीकडे महाराष्ट्रत कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे कंगना राणावत आणि शिवसेना यांच्या वादां मध्ये मुंबई पोलिसांवर आरोप प्रत्यारोप होत आहे.
या सर्वांमध्ये सुद्धा मुंबई पोलीस अतिशय उत्तम प्रमाणे काम करत आहे त्यांना माझ्या सल्यूट अशी प्रतिक्रिया चला हवा येऊ द्या फेम अभिनेते भरत गणेशपुरे यांनी दिली आहे.
सर्वांना हसवणारा अभिनेता अशी ओळख असणाऱ्या भारत गणेशपुरे ते आपल्या गाडीत मुंबईच्या कांदिवली येथे थांबले असता चोरट्यांनी आपली हातसफाई दाखवून त्यांच्या मोबाईल चोरला होता.
ही घटना घडली नंतर त्यांनी याबद्दल माहिती एका व्हिडिओ शेअर करून दिली होती त्यानंतर मुंबई पोलीस कामाला लागली आणि ऑगस्ट २०२० मध्ये जे मोबाईल चोरीला गेला होता ते मुंबई पोलिसांनी आज परत शोधून काढले एक महिन्यापूर्वी चोरीला गेलेला मोबाईल अभिनेता भरत गणेशपुरे यांनी मिळाला याबद्दल मुंबई पोलिसांचे त्यांनी आभार मानले आहे.