मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे – निलम गोऱ्हे

0 35
नवी मुंबई –   औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक जवळ असल्याने सध्या राज्यात जोराने औरंगाबादचा नाव बदलून संभाजीनगर करा या मागणीने राजकारणं सुरु आहे. मात्र महाविकास आघाडीचा मुख्य घटक असलेल्या काँग्रेस पक्षाने या मागणीचा विरोध केल्याने भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि काँग्रेस पक्षावर चारही बाजूने टीका करत आहे. सर्वात आदी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली तर त्या नंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस  यांनी टीका करत म्हणाले होते कि शिवसेना आणि काँग्रेस मध्ये संभाजीनगर वरून नूरा कुस्ती सुरु आहे. आता त्यांच्या या टीकेला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उत्तर दिले आहे.

 

ग्रामपंचायत निवडणूक –  १४ गावात विखे विरुद्ध थोरात यांच्यात थेट लढत  

नीलम गोऱ्हे म्हणाले कि  औरंगाबादचे संभाजीनगर मुळात हा विषय वादाचा नाही. संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुखही आहेत. महाविकास आघाडीतील घटक, संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यामध्ये शंका नाही. पण काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पुणेच्या नामकरणाबद्दल ते म्हणाले कि  पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारले होते. मी उपसभापती असल्याने पुण्याच्या नामांतराबाबत कोणतीही एक भूमिका घेऊ शकत नाही.

                        नगरसह पुणे जिल्ह्यात ११ जानेवारीपासून सुरू होणार महाविद्यालय

Related Posts
1 of 1,332
सरकारवर टीका करणं हेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काम आहे – 
 राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बद्दल बोलताना ते म्हणाले कि  सरकारवर टीका करणं हेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काम आहे. जर त्यांनी टीका केली नाही तर ते नाटक कंपनीतीलच एक पात्र आहेत का अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिका निभावत आहेत. आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना धक्का बसला आहे. मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे अश्या शब्दात निलम गोऱ्हे यांनी देवेंद्र फडणवीसच्या टीकेला उत्तर दिला आहे.

तर राष्ट्रवादी नेते महेबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करणारी महिला अचानक बेपत्ता झाल्याने त्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत ते म्हणाले कि  शक्ती कायदा अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे जुन्या गुन्ह्यावर हा कायदा लागू होणार नाही. त्या पीडित महिलेचा पत्ता चुकीचा आहे. तिचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप होणार नाही. त्या महिलेने पुढे येऊन सगळे पुरावे द्यावे, कारवाई केली जाईल,’ असं आश्वासन निलम गोऱ्हे यांनी दिलं.

          हे पण पहा –  बाळ बोठेच्या स्टॅंडिंग अर्जावर आज निर्णय 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: