मी पण हिंदू आहे मात्र तांडव पाहून अपमानित झाले नाही

0 29

नवी मुंबई –  वेब सिरीज तांडव रिलीज झाल्यानंतर या सीरिजमधील काही भागावरून देशात चांगला वाद निर्माण झाला आहे. या सीरिजमधील काही भागावर केंद्र सरकारने  दखल  सुद्धा घेण्यात आली आहे.  या सिरीज मध्ये काही भागात हिंदू धर्माच्या भावना दुखावणारा आशय सादर करण्यात आला आहे. त्यातून हिंदू देवदेवतांचा अपमान होत आहे अशा टीकाकारांचे म्हणणे आहे

तांडव सिरीजचे दिग्दर्शकानं जाहीर माहितीसुद्धा मागितली आहे. मात्र भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांकडून ही सिरीज बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या सिरीज विरुद्ध आणि समर्थनात देशातील नागरिक आपल्या आपले मत मांडत आहे.
या सिरीज विरोधात सतत वादग्रस्त विधान करुन चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना राणावत यांनी सुद्धा ट्विट केला होता आणि म्हटले होते की तुम्ही अल्लाहची टिंगल करण्याचे धाडस दाखवू शकता का, तेवढी हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल तिनं तांडवचे दिग्दर्शकांना विचारला होता.

आता या प्रकरणात अभिनेत्री स्वरा भास्कर ने सुद्धा उडी घेतली आहे आणि ट्विट करत या सिरीजचा समर्थन केलं आहे.

Related Posts
1 of 62

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की मी पण एक हिंदू आहे. आणि ज्यावेळी मी तांडव मालिका पाहिली तेव्हा मला कुठेही अपमानित झाल्यासारखे वाटले नाही. आता मला प्रश्न पडला आहे तांडववर बंदी कशासाठी घातली जात आहे? अशा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विट द्वारे उपस्थित केला आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करच्या पुढे आता परत एकदा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: