मी घाबरत नाही पण मला हे लोक गोळी घालू शकतात – राहुल गांधी

0 28

नवी दिल्ली– केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागच्या दीड महिन्यापेक्ष्या जास्त कालावधी पासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करत आहे.

याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परत एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हंटले की या तिन्ही कायदामुळे देशातील शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, असं सांगतानाच मी मोदी सरकारला घाबरत नाही. हे लोक मला हात लावू शकत नाहीत. पण मला गोळी घालू शकतात, असा आरोप सुद्धा यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की
आता मी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरेच देणार नाही. ते काही माझे प्राध्यापक नाहीत. मी केवळ शेतकरी आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन, असं राहुल गांधी म्हणाले.

मोदी सरकारने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची वाट लावण्यास घेतली आहे. ते केवळ तीन कायद्यांवर थांबणार नाहीत तर शेतकऱ्यांची वाट लावूनच थांबणार आहेत. संपूर्ण देशाची शेती आपल्या तीन चार मित्रांच्या हवाली करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.

Related Posts
1 of 1,332

संपूर्ण देश विरोधात गेला तरी मी सत्याच्या बाजून लढत राहील. मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही. मी स्वच्छ चारित्र्याचा आहे. हे लोक मला हात लावू शकत नाही. गोळी घालू शकतात ही दुसरी गोष्ट आहे. पण मी देशभक्त आहे. यांच्याविरोधात उभा राहणारच, असं त्यांनी सांगितलं. हे लोक शेतकऱ्यांना थकवू शकतात, पण त्यांना मूर्ख बनवू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा आंदोलनाचं सन्मानच करत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात कोणी बोललं तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं. सत्ताधारी बोलताना कोणताही विचार करत नाहीत. संघाची त्यांना तशी शिकवणच आहे. मात्र, बोलण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: