मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात याचा विचार करा – रोहीत पवार

0 23

अहमदनगर- कर्जत जामखेड राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांना ट्विट करत प्रतिउत्तर दिला आहे.गोपीचंद पडळकर यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मिरजगाव येथील रस्त्यांची दुरवस्था वरून रोहित पवार यांच्यावर टीका केली होती .

ते म्हणाले होते की रोहित पवार देशाचे नेते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून आपली उंची मोजतात तुम्ही त्यांच्या खांद्या वरून खाली या आणि मग तुम्हाला कळेल तुम्ही किती खुजे आहे .

यालाच उत्तर देताना रोहीत पवार म्हणाले शरद पवार हे आमचे नेते आहे मार्गदर्शक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.मी कोणाच्या खांद्यावर बसला आहे हे पाहण्यापेक्षा आपण सध्या कुठे आहे ? याचा विचार करायला हवे असा सल्ला त्यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Related Posts
1 of 1,402

जर आपण तिकडे लक्ष दिला तर लोकांचा विश्वास तुमच्यावर नक्कीच वाढेल अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडिया व पोस्ट करून दिली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: