मिस्टर आयपीएलची आयपीएल मधून माघार


दुबई-आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाची अडचणीत काही कमी होत नाही दिसत. शुक्रवारी संघातील एक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संघाचा दुबईतला क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे. यानंतर लगेचच संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली आहे. सुरेश रैनानने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसके चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली आहे.
वैय्यक्तीक कारणांमुळे सुरेश रैनाने यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला असून आम्ही सुरेश रैना आणि त्याच्या परिवारासोबत आहोत अशी माहिती काशी विश्वनाथन यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नईत सुरेश रैना ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी झाला होता. १५ ऑगस्ट रोजी धोनीसोबत रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे सुरेश रैनाच्या जागी कोण चेन्नईचा संघात त्याच्या जागी वर खेळणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.