मिर्झापूर २ चा ट्रेलर झाला प्रदर्शित

0 45

मुंबई- बहुचर्चित  मिर्झापूर २ या वेब सीरिजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेली ही वेब सीरिज आता या दुसऱ्या सीझनमध्ये वेगळे वळण घेताना दिसणार आहे. आता या सीरिजमध्ये रिव्हेंज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २३ ऑक्टोबरपासून ‘मिर्झापूर २’ या वेबसीरिजचा दुसरा सिझन अॅमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे.  मिर्झापूर २’च्या २ मिनिट ४८ सेकंदाचा ट्रेलरपाहून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता वाढली आहे.

Related Posts
1 of 67
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: