DNA मराठी

मिचेल मार्शच्या जागी हैदराबाद कडून खेळणार हे अष्टपैलूखेळाडू……….  

0 212

दुबई – आयपीएलच्या १३ व्या सत्राला सुरुवात होऊन काहीच दिवस झाले आहे. परंतु सनरायजर्स हैदराबाद या संघाला सुरुवातीलाच एक मोठं झटका बसला आहे . दुखापतीमुळे हैदराबादच्या अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. याबाबतची माहिती हैदराबाद संघाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे मिचेल मार्श दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मार्श लवकरात लवकर या दुखापतीतून बाहेर पडो, अशी आम्ही आशा करतो . हैदराबादमध्ये मार्शच्या जागेवर वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डरचा  समावेश करण्यात आला आहे

Related Posts
1 of 2,548

रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्या विरुद्ध खेळत असताना मिचेल मार्शला ही दुखापत झाली होती. मिचेल मार्शला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे मार्श ऐवजी जेसन होल्डरला संघात स्थान दिले आहे. ३ वर्षानंतर होल्डर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे.  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: