मालिका विजयानंतर बीसीसीआयने जाहीर केला इतका बोनस

0 29

ब्रिस्बेन – गाबा येथे चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला तीन गडी राखून विजय मिळून मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक नवीन इतिहास रचला आहे. तब्बल बत्तीस वर्षानंतर गाभा आहे ते ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाला आहे.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने सामना आणि मालिका जिंकण्यासाठी ३२८ धावांच्या लक्ष दिला होता.

शुबमन गिल, रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना तीन गडी राखून जिंकला आहे.

या विजयानंतर भारतीय संघाचा संपूर्ण जगातून कौतुक केला जात आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर बीसीसीआयनंही संघाचं कौतुक केलं आहे. तसंच संघाला ५ कोटी रूपयांचा विशेष बोनसही जाहीर केला आहे.

Related Posts
1 of 47

बीसीसीआयने या विजयानंतर एक ट्विट करून म्हटले आहे की “बीसीसीआयनं भारतीय संघाला पाच कोटी रूपयांचा विशेष बोनस जाहीर केला आहे. क्रिकेटमधील काही निवडक आणि विशेष क्षणांपैकी एक हा क्षण आहे. भारतीय संघानं उत्तम खेळ आणि उत्तम कौशल्य दाखवलं आहे,”

मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर गुंडाळला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: