मालदीवचा पाकिस्तानला झटका , ‘या’ प्रकरणी भारताची दिली साथ !

भारत -पाकिस्तानमध्ये असलेले तणाव हे जग जाहीर आहेत. मात्र या लढाईत कित्येक देश भारताच्या बाजूने उभे आहेत ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे . आतादेखील मालदीवने सार्क परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताला साथ दिली आहे. याआधीदेखील मालदीवबाजूने OIC मध्ये भारताच्या बाजूने साथ दिली होती.
दरम्यान १९ व्या सार्क परिषदेचे आयोजन पाकिस्तानात करण्याचा प्रस्ताव आला होता पण हा प्रस्ताव रोखण्यात मालदीवने भारताला साथ दिली.त्यावर्षी पाकिस्तानात या परिषदेचा संयोजक होता.पाकिस्तानने उरीमध्ये केलेल्या हल्ल्यानिषेधार्थ भारताने सार्क परिषदेवर बहिष्कार घातला होता . भारताची साथ देत अन्य देशांनी सुद्धा यामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी स्पष्ट केले की ,सध्याच्या स्थितीत आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करत आहोत. त्यामुळे सार्क परिषदेवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही” . मालदीवच्या या धोरणामुळे आता पाकिस्तानला झटका बसला असून सार्क परिषदेचे यजमानपद मिळवण्याची पाकिस्तानची योजना धुळीस मिळाली आहे.