माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत ६९ लाख ९४ हजार घरांना भेट – मुख्यमंत्री

मुंबई – करोनामुक्त महाराष्ट्र करण्याचा उद्दीष्ट समोर ठेवून महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील शहर, गावामधील वस्त्या यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षणही देण्यात येईल. ही मोहीम १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे. या मोहिमेत गेल्या आठवड्यात काय काय घडलं त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
ते म्हणाले माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत ५५ हजार २६८ पथकं स्थापन करण्यात आली आहेत. तर आत्तापर्यंत ६९ लाख ९४ हजार घरांना भेट देऊन झाली असून आत्तापर्यंत २ कोटी २४ लाख व्यक्तींची तपासणी झाली आहे. ३७ हजार ७३३ कोविड संशयित व्यक्तींची तपासणीही झाली आहे. त्यापैकी ४ हजार ५१७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.