DNA मराठी

माजी रणजीपटू शेखर गवळी यांचं निधन 

1 109

नाशिक :महाराष्ट्राचे माजी रणजीपटू शेखर गवळी हे कसारा घाटात पाय घसरून दरीत बेपत्ता झाले असून   नाशिक जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन तसंच अग्निशमन दल यांनी शोध मोहिम राबविली  आहे. शेखर गवळी हे त्यांच्या मित्रांबरोबर नाशिकमधील  इगतपुरी येथील मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले असता काल  मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पाय घसरून ते दरीत पडले आणि बेपत्ता झाल्याची  घटना घडली . संध्याकाळी अंधार झाल्यामुळे शोध मोहिम थांबवण्यात आली असून सकाळी पुन्हा शोध चालू झालाय . 

Related Posts
1 of 2,492

आज सकाळपासून पाणबुड्यांच्या मदतीने दोन डोहात शेखर यांचा शोध घेण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. शेखर गवळी नाशिक मध्ये खेळणाऱ्या क्रिकेट पटुची प्रशिक्षक होते. तसेच काही रणजी प्लेयर्स सुद्धा त्यांच्या हाताखाली तयार झाले होते. क्रिकेटमधील एक उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांचं नाव होत त्यांना सायकलिंग आवड होतीच आणि ट्रेकिंगची आवड होती. 

Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: