माजी आ. नागवडे जयंतीनिमित्त श्रीगोंदेकरांना नामवंतांच्या व्याख्यानांची मेजवानी

0 27
श्रीगोंदा  – राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव नागवडे यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 19 ते 21 जानेवारी दरम्यान नामवंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली. मंगळवारी 19 जानेवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर स.8 वा. व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स.9.30 वा. प्रतिमा पूजन व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात माहीती देताना नागवडे म्हणाले की, येथील लोकनेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवित असते.गेली बारा वर्षे अखंडीतपणे ही व्याख्यानमाला सुरु असून व्याख्यानमालेचे हे 13 वे वर्ष आहे.यापूर्वीही राज्यातील नामवंत,विचारवंतांनी या व्याख्यानमालेची पुष्प गुंफली आहेत. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही व्याख्यानमाला होत आहे.मंगळवारी 19 रोजी स.10 वा. आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे “माणसात देव आहे” या विषयावरील व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हे असणार आहेत.तत्पूर्वी स.8.30 वा.रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन जि.प.च्या माजी सभापती अनुराधा नागवडे यांच्या हस्ते होणार आहे.तर स.9.30 वा.महाविद्यालयात आवारीतील स्व.बापूंच्या पुतळ्याला माजी मंत्री बबनराव पाचपुते, ‘जगताप’ कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.राहूल जगताप,जि.प.चे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार,नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे,बाजार समितीचे सभापती संजय जामदार,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार,जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे,प्रा.तुकाराम दरेकर,जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते,सभापती सौ.गितांजली पाडळे, कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर,बाळासाहेब नाहाटा,कैलासराव पाचपुते,उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे,उपसभापती संजय महांडुळे,राजेंद्र म्हस्के,बाळासाहेब दुतारे,हरिदास शिर्के,जिजाबापू शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येईल.
नागवडे व्याख्यानमालेतील “महाराष्ट्र काल,आज आणि उद्या” या विषयावरील दुसरे पुष्प बुधवारी दि.20 रोजी स.10 वा. औरंगाबाद येथील विचारवंत,माध्यम व शिक्षण तज्ञ सचिन तायडे हे गुंफणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप हे असणार आहेत.तर तिसरे शेवटचे व्याख्यान बुधवारी स.10 वा. होणार असून संत साहित्याचे अभ्यासक, जेष्ठ नेते व उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार यांचे होणार असून “आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत.याशिवाय प्रसिध्द व्याख्याते प्रा.डाॅ.अशोक देशमुख यांचेही व्याख्यान यावेळी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब धायगुडे असणार आहेत अशी माहीती नागवडे यांनी दिली.
Related Posts
1 of 1,290
  मंगळवारी दि.19 जानेवारी रोजी स.8 वा. ‘नागवडे’ कारखाना कार्यस्थळावर मध्यवर्ती कार्यालयासमोर माजी आ. शिवाजीराव नागवडे यांच्या प्रतिमा पूजनाचे व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती त्यांनी दिली. माजी आ.स्व. शिवाजीराव नागवडे यांचे 87 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभा व व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅ.सतिशचंद्र सुर्यवंशी,उपप्राचार्य एस. एन.उंडे,संस्थेचे निरीक्षक सचिन लगड  व विश्वस्त मंडळाने केले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: