मागच्या ७२ तासातटेलिग्रामला भेटले अडीच कोटी नवीन युजर्स 

0 37
 नवी दिल्ली –   व्हॉट्सअॅप ने आपली नवीन पॉलिसी आणल्यानंतर रोज सिग्नल आणि टेलिग्राम या  अॅप ला  डाउनलोड करणाऱ्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ सुरु आहे.   व्हाट्सअप च्या नवीन पॉलिसीनंतर युजर्सच्या डेटावरून चिंता व्यक्त केली जात आहे.
व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीचा फायदा टेलिग्राम आणि सिग्नल या मेसेजिंग  अॅप ला होत आहे. व्हाट्सअपच्या नवीन पॉलिसीनंतर  टेलिग्राम मेसेजिंग अॅपमध्ये मागच्या ७२ तासात अडीच कोटी नवीन युजर्स जोडले गेले आहेत. कंपनीने हे युजर्स जगभरातून जोडले आहेत. परंतु, सर्वात जास्त ३८ टक्के युजर्स हे आशियातील आहेत. तर २७ टक्के युजर्स हे युरोपमधील आहेत. २१ टक्के युजर्स हे लॅटिन अमेरिकातील तर ८ टक्के युजर्स हे MENA तून आले आहेत. अशी माहिती टेलिग्रामने दिली आहे.
Related Posts
1 of 1,344
व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीत बदल केल्यानंतर भारतातील सिग्नल आणि टेलिग्रामची संख्या ४० लाखांपर्यंत वाढली आहे. सिग्नलने या स्पर्धेत बाजी मारली आहे. ६ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत २.३ मिलियन नवीन डाउनलोड सोबत टॉप स्पॉट मिळवले आहे. तर टेलिग्रामने या दरम्यान १.५ मिलियन नवीन डाउनलोड मिळवले आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: