महिलेने चक्क लगावली पोलिसाच्या कानशिलात , जाणून घ्या कारण …

सध्याच्या कोरोनामहामारीत पोलीस आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत . अशा परिस्थितीमध्ये आपण पोलिसांना सहकार्य करून त्यांचे आभार मानले पाहिजेत.मात्र मुंबई येते एका ४६ वर्षीय महिलेने चक्क वाहतूक पोलिसाला शिवीगाळ त्याच्या कानशिलात मारली आहे .प्रिती खोत असे महिलेचे नाव आहे .जाणून घेऊया नेमका कसा घडला हा प्रकार …
संबंधित महिलाला सिग्नल तोडल्याने वाहतूक पोलिसाने थांबवले, त्यातच तिची मुलगी दुचाकीवरून पडली.झालेला प्रकार पाहता वाहतूक पोलीस तिच्या मदतीसाठी धावले.मात्र तुमच्यामुळे मुलगी दुचाकीवरून पडल्याचा आरोप त्या महिलेने करत पोलिसाला शिवीगाळ करून त्यांच्या कानाखाली मारली.
झालेला प्रकार नक्कीच निंदनीय आहे . इतर वाहतूक पोलिसांनीसंबंधित महिलेवर गुन्हा दाखल करीत तिला पोलीस ठाण्यात नेले.वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला दंड ठोठावण्यात आला.