महिलेनं आपल्या मुलासोबत रेल्वे इंजिनखाली उडी घेऊन केली आत्महत्या

0 165

लालसगाव- जिल्ह्यातील लासलगाव इथं एसटी वाहक असलेल्या महिलेनं आपल्या तरुण मुलासोबत रेल्वे इंजिनखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.अंजली भुसनळे, उत्कर्ष भुसनळे अशी या दोघांची नावे आहे.

आज सकाळी लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या रेल्वे इंजिन समोर दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.अंजली भुसनळे या येवला बस आगारात वाहक म्हणून कार्यरत होत्या.

Related Posts
1 of 2,052

अंजली आणि त्यांच्या मुलाने आज सकाळी रेल्वे स्टेशनजवळ पोहोचल्या आणि समोरून येणाऱ्या धावत्या रेल्वे इंजिनखाली उडी घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

अंजली आणि त्यांच्या मुलाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: