महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे नोंदविताना ‘हे’ नियम पाळावे लागणार : केंद्र सरकारकडून निर्देष !

0 14

उत्तर प्रदेश च्या हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी संपूर्ण देशात संतापाची लाठ उसळली आहे .ही घटना ताजी असतानाच झारखंडमध्येही असाच प्रकार समोर आला आहे .तसेच हाथरस कथित बलात्कार आणि मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पोलिसांकडून देण्यात आलेल्या वागणुकीमुळे अवघा देश ढवळून निघाला होता.अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून केंद्राकडूनकाही नियमावली जाहीर करण्यात आली आहे .

यानुसार ,महिलांसंबंधी गुन्हे प्रकरणात पोलिसांना कारवाई अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .. महिलांविरुद्धच्या गुन्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या बाहेरही घडला असेल तर अशा स्थितीत ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात यावी, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

पोलीस स्टेशनच्या कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याद्वारे महिलाविरुद्धच्या गुन्ह्यांत एफआयआर दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचं आढळल्यास त्यांना कठोर दंड दिला जाण्याची तरतूद शिक्षेमध्ये आहे.

Related Posts
1 of 1,357

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: