
काही दिवसांपासून महिलांच्या छेडछाडी , बलात्कार यासारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवीन प्लॅन तयार केला आहे. यानुसार , योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत की, राज्यामध्ये कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात यावे.
गुन्हेगारीला आळा बसवणाऱ्या या मोहिमेला मिशन दुराचारी असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेची सर्व जबाबदारी पोलीस खात्याकडे असेल .तसेच महिलांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेत, महिला पोलीस अधिकारी शहरांमध्ये स्त घालतील आणि महिलांची छेड काढणाऱ्यांवर नजर ठेवतील. तसेच अशा वक्तीविरोधात कठोर कारवाई करावी असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
जर कोणी महिलांची छेड काढताना सापडला तर त्यावर कडक कारवाई व्हावी तसेच या व्यक्तींचे फोटो शहरातील चौकांमध्ये लावण्यात यावेत असे आदेश योगींनी दिले आहेत .