महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही – आदित्य ठाकरे

0 30
नवी मुंबई –  शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवला आहे . या नोटीसनंतर भारतीय जनता पक्षावर महाविकास आघाडीने चारही बाजूने टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुध्दा टीका करताना म्हणाले कि हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
या यादी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुध्दा भारतीय जनता पक्षावर टीका करताना म्हणाले कि  आज भाजपच्या विरोधात जे कोणी काही बोललं की त्यांच्यावर ईडीची किंवा सीबीआय चौकशी लावली जाते. आम्ही सीबीआय बद्दल निर्णय घेतला आहे तर आता आमच्या परवानगी शिवाय आता राज्यात येऊ शकत नाही . आम्ही महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण कधी पाहण्यात आलेलं नाही अशी टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
Related Posts
1 of 1,321
तर संजय राऊत यांनी सुध्दा भारतीय जनता पक्षावर टीका करत म्हणाले कि   मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ अशी प्रतिकिया त्यांनी दिली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: