महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण अजित पवार यांना क्लीन चिट.

0 41

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य ६९ जणांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक अपराध आणि अन्वेषण विभागानं कोर्टात अहवाल आज सादर केला होता . एक वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरवे न मिळाल्याने खटला चालू शकत नाही असं कोर्टात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.

ईओडब्ल्यूला एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. आरोप होता महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्यामुळे २५००० कोटी रुपयांचे नुकसान झालं. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील मनी लाँन्ड्रींग प्रकरणानं देखील गुन्हा दाखल केला होता आणि अजित पवार यांचा देखील जबाब नोंदवून घेण्यात आला होता.

आता EOWने तपासणी विभागाला क्लोजर कॉपीदेखील पाठवली .पोलीस अधिकाऱ्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  ईडीने क्लोजर रिपोर्टला कोर्टात विरोध केल्याची माहिती मिळाली आहे.

Related Posts
1 of 1,388

भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. या तपासात ३४ बँक शाखांमध्ये १ वर्ष तपासणी करण्यात आली. या दरम्यान हजारोंच्या संख्येत कागदपत्र आणि ऑडिट रिपोर्टची तपासणी करण्यात आली. १०० हून अधिक लोकांची चौकशी देखील करण्यात आली. मात्र यामध्ये कोणतेही पुरावे मिळू शकले नाहीत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: