महाराष्ट्राला वादळाचा धोका : सतर्कतेचा इशारा !

0 10

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे . हे क्षेत्र येत्या 24 तासांत अधिक खोल होऊ शकते.या परिस्थितीमुळे याचे रुपांतर वादळात होऊ शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार , तयार झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्रसहित अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडू शकतो .ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Posts
1 of 1,359

परिस्थिती पाहता बंगालच्या उपसागरावली क्षेत्रामुळे ओडिशामधील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच येत्या काही दिवसांत दक्षिण ओडिशा येथे 45-55 किमी वेगाने जोरदार वारे वाहतील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: