महाराष्ट्रात डिसेंबरपूर्वी लागणार राष्ट्रपती राजवट, प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान !

0 35

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजेल अशी एक धक्कादायक घटना घडली आहे.महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनीकेला आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.आधीच राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा काही ना काही निमित्ताने वारंवार होत असतेच. त्यात आता आंबेडकरांचे हे विधान सत्य तर नसेल ना याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .

प्रकाश आंबेडकर म्हटले आहेत की, केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागेल.याला कारण म्हणजे राज्य सरकारकडून सातत्याने केंद्राचे निर्णय धुडकावले जात आहेत.

Related Posts
1 of 253

केंद्राने मंजूर केलेल्या केलेल्या कृषी कायद्यांवरून, शेतकऱ्यांच्या हितांशी तडजोड आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचाही या कृषी कायद्यांना ठाम विरोध आहे. त्यावर बोट ठेवत आंबेडकर यांनी आपले मत मांडले आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: