महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली त्या सर्व लोकांनी तोंड न लपवता जाहीरपणे माफी मागावी- रोहीत पवार

0 45

मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवीन नवीन तथ्य समोर येत आहे याच मध्ये आज एम्स हॉस्पिटलची रिपोर्ट समोर आली आहे त्यामध्ये सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नाही हे आज स्पष्ट झाले आहे .

याच रिपोर्टचा आधार घेत कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टी वर टीका केली आहे हे टीका त्यांनी ट्विट करत केली.

त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की बिहार निवडणूक साठी जे लोक सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या मनसुबे यावर आज एम्सची रिपोर्ट ने पूर्णपणे पाणी फेरले आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

Related Posts
1 of 1,359

ज्या लोकांनी आमच्या महाराष्ट्राची आणि आमच्या मुंबई पोलिसांची बदनामी केली त्या सर्व लोकांनी तोंड न लपवता जाहीरपणे महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी असा टोला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नाव न घेता ट्विट करून लावला आहे .

या पूर्वी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरुवातिच्या तपासात मुबंई पोलिसानी ही हत्या नसून आत्महत्या आहे हे स्पष्ट केले होते परंतु सीबीआयच्या तपासा दरम्यान ही आत्महत्या नाही हत्या आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली होती याच वेळी काही भारतीय जनता पक्षाचे बिहार आणि महाराष्ट्रा मधील काही नेत्यानी मुंबई पोलिसाच्या कामा बद्दल टीका केली होती यावरूनच रोहित पवार यांनी आज नाव न घेता भारतीय जनता पक्षा वर टीका केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: