मला राज्याचे राजकारणात खूप काही करायचे आहे – देवेंद्र फडणवीस

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीचं प्रभारी पद दिलं आहे. तेंव्हा पासूनच देवेंद्र फडणवीस हे देशाच्या राजकारणात जाणार असल्याचंही बोललं जातं आहे. त्या सगळ्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका आज पूर्णपणे स्पष्ट केली आहे. आपण दिल्लीत न जात आपल्याला महाराष्ट्रातच राजकारण करायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
फडणवीस म्हणाले पूर्वी राज्यातल्या एखाद्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली तर सर्व त्याचं अभिनंदन करत असत. आता संकुचित राजकारण झालं आहे. आमच्या पक्षातही पीढी बसलली आहे. पूर्वी अरुण जेटली, अनंतकुमार यांच्यासारखे नेते ही जाबाबदारी सांभाळत होते. आता पक्षाने माझी निवड केलीय.
बिहारच्या निवडणुकांसाठी मी काम करणार असलो तरी महाराष्ट्राचं राजकारण सोडून जाण्याचा प्रश्न उपस्थित होतच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही करायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.