मला ज्यावेळेस वाटेल तेव्हा मी त्यांना भेटेन- एकनाथ खडसे

0 54

जळगाव- भारतीय जनता पक्षा वर मागच्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत काल दिवसभर चर्चा रंगली होती.

परंतू शरद पवार यांच्या भेटीबाबत नियोजन नसल्याचे खडसे यांनी सांगून,मला वाटेल तेव्हा शरद पवार यांची भेट घेईल,त्यांच्या भेटीसाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाराज भाजपचे  ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून खूप जोरात सुरू आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चा करून चाचपणी केली.

Related Posts
1 of 1,390

आहे.या पार्श्वभूमीवर खडसे आणि पवार यांच्या भेटीबाबत काल दिवसभर चर्चा सुरू होती.तर या भेटीबाबत शरद पवार यांनीही नियोजन नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.


पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर खडसे यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पवार आणि आपली भेट झाली नाही पण मला ज्यावेळेस वाटेल तेव्हा त्यांना भेटेन,या भेटीसाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही असे खडसे यांनी स्पष्ट आहे आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: