मला कुठेही मुख्यमंत्री होण्याची घाई लागली नाही – अशोक चव्हाण

0 27
नांदेड – राज्यात  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ह पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे . मात्र या महाविकास आघाडी सरकार मध्ये सर्वकाही व्यवस्थित नाही आहे अशी चर्चा मागच्या काही दिवसांनी होत आहे. मागच्या २ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपादन मंत्री जयंत पाटील यांनी आप्ल्यालापण मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असे विधान केले होते तर आज नांदेड मधील भोकर मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदासाठी वक्तव्य केले आहे.
 भोकरमध्ये विकास कामांच्या शुभारंभ काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. या वेळी बोलत असताना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल आपली इच्छाच बोलून दाखवली. त्यांनी म्हटले कि मला कुठेही मुख्यमंत्री होण्याची घाई लागली नाही. उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. त्यांच्याबरोबर आम्ही मनापासून साथ देत आहे’, असं वक्तव्य अशोक चव्हाण केले. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं उत्तम काम चालू असल्याचे सांगून आघाडीत मला बिघाडी करायची नाही असंही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

Related Posts
1 of 1,332

पुढे बोलतांना ते म्हणाले कि आज महाविकास आघाडी सरकारमध्ये काही जण बिघाडी करण्याचे काम करत आहे. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. प्रामाणिकपणे आम्ही ज्या पक्षाशी बांधिलकी बांधली आहे. सोनिया गांधी यांनी आम्हाला जो आदेश दिला आहे. त्यानुसार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शरद पवार, अजित पवार ही सर्व मंडळी भक्कमपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. पुढील पाच वर्ष महाविकास आघाडी सरकारला साथ देईल.

मोक्काचे गुन्ह्यामध्ये मागील दीडवर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

हे महाविकास आघाडी सरकार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला म्हणून सरकार स्थापन झाले. या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही भाजपला रोखण्यात यशस्वी राहिलो आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यात विकास कामे जी झाली आहे ती केवळ महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यामुळे झाली आहे असं अशोक चव्हाण म्हणाले.

               माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे व गणेश बोरुडे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: