मराठी शाळेच्या अडोशाला चालला खेळ, खेळ पडला महागात, 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल,


अहमदनगर – पारनेर – पारनेर तालुक्यातील देवीभोयरे गावात मराठी शाळेच्या पाठीमागे जुगार खेळताना सापडले असून , जुगार खेळणाऱ्या 10 जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे, 8310 रुपये ची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे गावा मधील मराठी शाळेच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी गोविंद शामराव पवार वय 39 दीपक एकनाथ साळवे वय 42 शरद बबन बोरुडे वय 40 भानुदास गणपत केदारे वय 54 सुनील आबु साठे वय 41 बाळू शामराव ससाणे वय 40 रवींद्र पांडुरंग गाजरे वय 37 रमेश सुदाम पोपळघट वय 39 आनंदा भिका सुरडे वय 54 सर्व रा देवीभोयरे ता पारनेर कोंडीबा रामचंद्र वरखडे वय 60 रा निघोज ता पारनेर हे विनापरवाना बेकायदा तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, पोलिसांनी जागर खेळत असताना कारवाई केली त्या ठिकाणी 8310 रु रोख रक्कम आणि जुगाराच्या साहित्यासह पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आले त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात पो.ना. विश्वास अर्जुन बेरड स्था. गु. शा. जि. अहमदनगर यांनी दिली त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. एस व्ही गुजर हे करत आहेत.