मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही -रामदास आठवले !

0 20

प्रकाश आंबेडकरांनी खासदार उदयनराजे याना बिनडोक म्हणत निशाणा साधला होता .यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांच्या विधानाशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. सर्वांनाच डोकी आहेत आणि कोणाला बिनडोक म्हणणे चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले.

तसेच फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी आहे. मराठी बोलणं सक्तीचे करता येणार नाही असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.शिवसेनेच्या उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांचे युनिट आहेत. मग ते सगळे मराठी बोलतात का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Related Posts
1 of 253

दरम्यान मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत एमपीएससी परिक्षा घेऊ नये असे उदयनराजे म्हणाले होते .यावर आठवले म्हणाले की, एमपीएससी परिक्षा झालीच पाहीजे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: