मराठा समाज आक्रमक : मराठा समाजाचे नेते काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष !

एकीकडे देशात कोरोनामहामारीचे संकट असताना मराठा आणि धनगर समाज्याने आरक्षणासाठी तगादा लावला आहे . या समाजांकडून सरकारविषयी असेलेला रोष वाढताना दिसत आहे. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. कोल्हापूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरूवात झाली आहे. या परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते उपस्थित आहेत त्यामुळे परिषदेत काय निर्णय घेतले जातो, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.या परिषदेनंतर आरक्षणविषयी मराठा समाजाची पुढची पाऊले काय असतील हे स्पष्ट होईल.
अगोदरपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलने सुरु केली आहेत . मात्र सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजामार्फत सरकारविषयी रोष पसरला आहे. यामुळे आजच्या परिषदेमध्ये कुठले ठराव केले जातील याकडे लक्ष लागले आहे.