
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण लावलेली तात्पुरती स्थितीमुळे राज्यात राज्य वातावरण तापले आहे सर्व विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करत आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाज समाजांमधील मोठे नेत्यावर तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर हल्ला केला आहे. ते म्हणाले मराठा समाजाच्या नेत्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता कधीच नव्हती. १९९९ ते २०१४ पर्यंत राज्य काँग्रेस राष्ट्रवादीचे पूर्ण बहुमताचे सरकार होते तेव्हा त्यांनी आरक्षण का दिला नाही? असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे .
आज मराठा समाजाच्या तरुणाला आरक्षणाची गरज आहे कारण आरक्षण मिळालं नाही तर समाजांमधील मुले शिकणार नाही शिकणार नाही तर नोकरी मिळणार नाही शेतीवर अवलंबून राहण्याची वेळ गेली आहे.
आज मराठा आरक्षण वर जी स्थिती आहे ते फक्त आणि फक्त मराठा समाजा मधील काही मोठे नेत्यामुळे निर्माण झाली आहे असा आरोप देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये लावला.