मराठा नेत्यांकडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !

राज्यभरातून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे .सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहेत . याचाच परिणाम म्हणून मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापूरमध्ये गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे.तोपर्यंत मागण्या मान्य झाल्यास बंदची हाक मागे घेऊ असं आश्वासनदेखील मराठा समाजाने दिले आहे .
मात्र असे नाही झाले तर मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल . गोलमेज परिषदेमध्ये एकूण १५ ठराव करण्यात आले आहेत .९ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्यास सर्व काही सुरळीत होईल तसेच पुढे हे आंदोलन राज्यभर सुरूच राहील .
मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे पण ती कधी मिळेल हे माहित नाही . सरकार फक्त घोषणा करत असून त्यांच्याकडे बजेट नाहीअसं मराठा समाज म्हणत आहे .जर सरकारने ठराव मान्य केले नाहीत तर १० तारखेनंतर थोबाड फोडो आंदोलन करू, असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे .