मराठा आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही – देवेंद्र फडणवीस

0 150

मुंबई – मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेल्या कालखंडात या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर आज पूर्णपणे पाणी फेरल्या गेला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण निश्चित कायम राखता आले असते. परंतु सुरवातीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नावर हे सरकार गंभीर नव्हते आणि आज त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस-रात्र एक करुन आम्ही परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करुन ते टिकविता आले नसते हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग आम्ही गठीत केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करुन ते आरक्षण टिकविले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो आहोत.  

Related Posts
1 of 2,047

 प्रारंभीपासूनच न्यायालयीन प्रत्येक बाबी मध्ये या सरकारने दुर्लक्ष केले. कधी वकिल हजर झाले नाही, तर कधी वेळेत आवश्यक परिपूर्ती केली गेली नाही. मागासवर्ग आयोग ७ महिन्यांपासून गठीत केलेला नाही. यासाठी आपण पत्रव्यवहार सुद्धा केला. पण, सरकारने त्याचा ही उत्तर दिला नाही. असे असले तरी मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत आहोत. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु. या लढ्यात ते एकटे नाहीत. आम्ही सारे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनवाई घटनापीठा कडे देण्यात आले आहे.  घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. मराठा आरक्षणाअंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: