मराठा आरक्षण : उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली होणार मोठा निर्णय !

0 38

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. माहितीनुसार ,या आंदोलनासाठी पहिली ठिणगी ही साताऱ्यात पडणार आहे. या विषयावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून न्यायालयात न्यायालयीन लढा देण्यासाठी मराठा समाज आंदोलकांनी मोठे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल, यासाठी काय उपाययोजना केल्या तर सरकारवर दबाव येईल अशा वेगवेगळ्या मुद्यांवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.दोन दिवसांत ही बैठक पार पडणार आहे .

Related Posts
1 of 1,402

या बैठकीनंतर मराठा समाजाची पुढची दिशा काय असेल हे स्पष्ट होईल .त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: