मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने केला सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मराठा आरक्षण स्थगिती मिळण्याच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्यानंतर हा तिढा सोडविण्यासाठी सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या अर्जावर न्यायालय कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगिती मुळे चालू शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही .तसेच नोकरीतही आरक्षण मिळणार नाही त्यामुळे या निर्णयाविरोधात मराठा समाजात तीव्र असंतोष आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देते यावर मराठा आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात सरकारची पक्ष व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली .मराठा समाजाचे आरक्षण कायम राहिल यासाठी प्रयत्नांची कुठलीही कसर सोडली जाणार नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.