मयत व्यक्तिचे जागी बनावट इसम उभा करुन जमिनीची बनावट खरेदीखताव्दारे विक्री करुन फसवणूक करणारा फरार आरोपी जेरबंद 

0 28
अहमदनगर –  मयत व्यक्तिचे जागी बनावट इसम उभा करुन जमिनीची बनावट खरेदीखताव्दारे विक्री करुन फसवणूक करणारा फरार आरोपी  पुरुषोत्तम कुरुमकर याला लालटाकी येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि  दिनांक २७ मार्च २०१८ रोजी आरोपी नामे १) पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर, रा. लिंपनगाव, ता- श्रीगोंदा,२) निंभोरे मेजर, रा. घोटवी, ता- श्रीगोंदा यांनी व त्यांचे साथीदारांनी मिळून गुरव पिंपरी, ता- कर्जत येथील शेती गट नं. ६७४ मधील २२ एकर जमीन ही जमीनीचे मूळ मालक मयत झालेले असल्याचे माहीती असतानाही सदर जमिनीचे बनावट खरेदीखत तयार करुन सदरची जमिन ही श्री. एकनाथ बाळासाहेब बांदल, रा. करडे, ता- शिरुर, जि- पुणे व त्यांचे साथीदारांना विक्री केली होती. सदर जमिन खरेदीचे व्यवहारामध्ये फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी श्री. एकनाथ बाळासाहेब बांदल, रा. करडे, ता- शिरुर, जि- पुणे यांनी दि. १२ डिसेंबर २०२० रोजी कर्जत पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. १ ११३५/२०२०, भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, १२०(ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

   इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत -निलेश राणे 


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हे नजरेआड झालेले होते. गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांनी सुचना दिल्याने त्याप्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोनि श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे पुरुषोत्तम कुरुमकर हा लालटाकी, अहमदनगर परिसरात येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लालटाकी येथे जावून सापळा लावून मिळालेल्या माहितीवरुन आरोपी नामे पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर, वय- ४० वर्षे, रा. लिंपनगाव, ता- श्रीगोंदा यास ताब्यात घेवून कर्जत पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही कर्जत पो.स्टे. करीत आहेत.
Related Posts
1 of 1,292
आरोपी पुरुषोत्तम बाबूराव कुरुमकर याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे
१) कर्जत पो.स्टे. गुरनं. 1६४/२०२०, भादवि कलम ४२०,४६५,४६७, ४६८, ४७१, ४७२, ३४ प्रमाणे
२) श्रीगोंदा पो.स्टे. गुरनं. १३१४/२०२०, भादवि कलम १४३, १४७, १४९, ३२६, ३२४, ३४१, ३२३ प्रमाणे
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार आगरवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, पोनि/श्री. चंद्रशेखर यादव, सपोनि/सुरेश माने, कर्जत पो.स्टे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/गणेश इंगळे, सफौ/नानेकर, पोहेकॉ/संदीप घोडके, विष्णू घोडेचोर, पोना/शंकर चौधरी, दिनेश मोरे, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/योगेश सातपूते, चालक पोना/अर्जून बडे तसेच कर्जत पो.स्टे. चे पोकॉ/शाम जाधव व पोकॉ/गोवर्धन कदम यांनी केलेली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: