स्थायी समिती सभापती अडचणीत येण्याची शक्यता..? 

0 75

अहमदनगर – महापालिकेतील  स्थायी समिती सभापती निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस करून करण्यात आलेल्या राजकारण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे . अहमदनगर महापालिकेचे नवनिर्वाचित सभापती मनोज कोतकर यांना भाजपकडून  काल नोटीस पाठवण्यात आली आहे.  

मनोज कोतकर यांनी स्थायी सभापती निवडणूक साठी अवघ्या एक दिवस पूर्वी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपचे अहमदनगर शहराध्यक्ष भैया गंधे यांनी कोतकरांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.आपण कोणत्या पक्षात आहात हे जाहीर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा भाजपने मनोज कोतकर यांना दिला आहे.

 स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. परंतु, शेवटच्या दिवशी मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीने आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला होता. 

Related Posts
1 of 2,079

त्यामुळे शहरांमध्ये राज्य सरकार चालवणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येच स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक होणार होती. परंतु, शिवसेनेनं निवडणूक होण्यापूर्वीच माघार घेतली. त्यामुळे मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती बिनविरोध निवड झाली. आता भाजपने नोटीस बजावल्यामुळे मनोज कोतकर यांना खुलासा करावा लागणार आहे ते या नोटीसचा काय  उत्तर देणार  हे पाहावे लागणार आहे.   

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: