मनुके आरोग्यास अत्यंत लाभदायक

0 25

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. रोज सकाळी उठून मनुके खा. त्यावर कोमट पाणी प्या.

रक्तदाब –
रक्तदाबाची समस्या असल्यास रात्री अर्धा ग्लास पाण्यात १० मनुके भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. इच्छा असल्यास भिजवलेले मनुकेही तुम्ही खावू शकता. यामुळे रक्तदाबाच्या  समस्येवर नक्कीच फायदा होईल.

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल
बदलत्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे. मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल

Related Posts
1 of 44

ऊर्जा प्रदान करतात
ऑफिसमध्ये थकल्यासारखे वाटत असल्यास मध्ये मध्ये मनुके खात रहा. मनुके ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. यात कार्बोहाइड्रेड आणि फायबर्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

रोज मनुक्यांचं नियमित सेवन केल्यामुळे आरोग्यास त्याचा फायदा  होवू शकतो. मधुमेहवर देखील मनुके गुणकारी आहे. शिवाय कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मनुके फायदेशीर आहेत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: