मनपाचे बहुतेक प्रकल्प अंतिम टप्प्यात २ सप्टेंबरला लावडासमोर अहवाल सादर करणार


अहमदनगर : ११ कोटींचे विविध प्रकल्प बुरूडगाव येथे चालू असून अपूर्ण राहिल्यामुळे ५ कोटींची बँक गॅरंटी मनपाला भरावी लागली आहे . बुरूडगावला कचराडेपोत प्रक्रियेविना टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषण आणि दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांना होतोय अशी तक्रारही आलीये . याप्रकरणी हरित लवादाकडे तक्रार केली असता हरिद लवादाने मनपाला प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेशही दिले . वेळोवेळी आदेश देऊनही मनपाकडून हे प्रकल्प पूर्ण न झाल्याने डिसेंबर २०१९ मध्ये लवादाने मनपाला ५ कोटींची बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेश दिले, परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तब्बल ६ महिन्यांनी ५ कोटींची बँक गॅरंटी भरली . हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून लवादापुढे सुनावणी सुरूच आहे . प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजीव रोहिदासने यांनी प्रकल्पाची पाहणी देखील केली असून १०० टॅन कचरा प्रक्रिया प्रकल्प , कत्तलखाना , हॉटेल वेस्टवर प्रक्रियेसाठी बायोमिथेनेशन , इन्सिलेटर , बायोमायनिंग , डी सेंट्रलाईझ सॉलिड वेस्ट प्रकल्प चीही पाहणी झाली असून २ सप्टेंबरला अहवाल सादर होणार आहे . प्रक्रियेविना सांड पाणी प्रक्रियेविना सीना नदीत सोडले जाते यासाठी ५ लाख जमा करण्याचे आदेशही दिलेत . सप्टेंबर नंतर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मनपाला ४० लाख भरावे लागणार आहेत .