मतदारसंघाचे स्थान उंचावण्यासाठी आमदाराच्या आईचा पुढाकार

0 39

कर्जत- रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा आपल्या नावाचा उल्लेख करून आमदारांच्या शपथविधीत रोहित पवार यांनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते.आपल्या आईच्या नावाचा उल्लेख करून व्यक्त केलेली कृतज्ञता सुनंदा पवार यांच्या कार्यापुढे आज तोकडी ठरताना दिसते.

आमदार रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी बारामती ऍग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार या देखील अनेक उपक्रमातून आमदार मुलाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातुन विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत.


स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन व्हावी’ हा मूलमंत्र देणाऱ्या आमदार माता सुनंदा पवार यांनी स्थानिक पातळीवर उतरून स्वच्छतेची सुरुवात करत आहेत.गवत,काट्यात हात घालून परीसर स्वच्छ करण्याची त्यांची ही ‘जिद्द’ अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांना आपल्या जबाबदारीचे दर्शन घडवणारी आहे.स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आपल्या तालुक्याचा प्रथम क्रमांक कसा येईल? याबाबत आता जागरूकता निर्माण झाली आहे. ‘

Related Posts
1 of 1,359

आधी करावे मग सांगावे’ या वचनाचे पालन करत आता सर्वच राजकीय पदाधिकारी,शासकीय अधिकारी,नगरपंचायत,रोटरी क्लब,हरित अभियान, बीजेएस,आजी माजी सैनिक संघटना,एन.एस.एस, एन.सी.सी,पत्रकार संघटना,सामाजिक संघटना,विद्यार्थी,ग्रामस्थ या स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत झोकून देऊन काम करत आहेत. विविध कल्पना सत्यात उतरवुन आगळे-वेगळे उपक्रमही राबवले जात आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: