मढेवडगाव सेवा संस्थेचे सचिव राजू अढागळे अखेर निलंबित

0 27
श्रीगोंदा –  मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव राजू पोपट अढागळे यांच्यावर कार्यालयीन आदेशाची अवमान्यता व कर्तव्यात कसूर केल्यामुळे व बदलीचे आदेश न जुमानल्यामूळे अखेर जिल्हा स्तरीय समितीने दि.२९ रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सेवामुक्त केले आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेतील सचिव राजू अढागळे यांच्यावर बोगस कर्ज, सभासदांवर ऍट्रासिटी दाखल करणे, परस्पर व्याज माफ करणे,वर्ग-३ जमिनीवर बोगस गृहकर्ज, संचालकांच्या वैयक्तिक हिताचे धोरण राबविणे यासारख्या असंख्य तक्रारी होत्या. याबाबत अंबादास सोनबा मांडे व काही कर्जदार सभासदांनी श्रीगोंदा सहाय्यक निबंधक, जिल्हा निबंधक व आयुक्त सहकार विभाग पुणे यांच्याकडे वारंवार तक्रारी,उपोषणे केली होती .

    हे पण पहा – अखेर हटवला देहविक्रीचा अड्डा

प्राथमिक चौकशीत सचिवांवर ठपका ठेवून सहाय्यक निबंधक व जिल्हा स्तरीय समितीने त्यांची बदली तीन महिन्यांपूर्वी बेलवंडी कोठार येथे केली होती तर त्यांच्या जागेवर कोरेगव्हाण सेवा संस्थेतील एस. बी. पवार यांची नियुक्ती केली होती. पण मढेवडगाव संस्थेतील सचिव अढागळे हे बदलीचे आदेश मिळूनही आदेशाला केराची टोपली दाखवत  त्याच जागेवर चिकटून बसले होते. याप्रकरणी अंबादास मांडे यांनी अप्पर सहकार आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याची तातडीने दखल घेत अप्पर आयुक्त यांनी श्रीगोंदा सहाय्यक निबंधक यांना सूचना करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही अढागळे वेगवेगळी करणे सांगून आदेश झिडकारात राहिल्याने अखेर जिल्हा स्तरीय समितीने त्यांना निलंबित केले.याबाबत अढागळे यांच्या कामकाजाची चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात येणार आहे.त्यांच्या जागेवर संतोष बाळासाहेब पवार यांची तातडीने नियुक्ती केली आहे.

Related Posts
1 of 1,301

   राज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचा एकही रूग्ण नाही – राजेश टोपे 

मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेतील सचिव राजू अढागळे यांच्यावर काही सभासदांनी  वर्ग-३ देवस्थान जमिनींवर बोगस कर्ज, खोट्या ग्रामपंचायत उताऱ्यावर गृहकर्ज, थकबाकीत असतानाही मर्जीतील संचालक व सभासदांना कर्ज वाटप, सभासदांवर ऍट्रासीटी गुन्हे दाखल करणे, परस्पर व्याज माफ करणे व अनियमित कारभार केल्याचे गंभीर आरोप केलेले आहेत. तरीही विद्यमान संचालक मंडळ सचिवांना पाठिशी घालण्याचे काम करत होते त्यामुळे अंबादास मांडे व काही कर्जदार सभासदांनी या गैरकारभारविरुद्ध  वेळोवेळी जिल्हा सहकार निबंधक, तालुका सहकार सहाय्यक निबंधक यांच्याकडे पुरावे देऊन संचालक व सचिवाची चौकशी करून कारवाईची मागणी केलेली आहे. व या सचिवाच्या गैरकारभार व बदलीसाठी उपोषणेही केली आहेत. इतके आरोप होऊनही संचालक मंडळ सचिवांना पाठिशी घालत होते.मागील प्रकरणांचे घोटाळे दुरुस्त करण्यासाठी बदली होऊनही सचिव जागा सोडण्यास तयार होत नव्हते.एक साधा सचिव तालुका व जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांचे आदेश मानत नसल्याने अखेर अढागळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागली.

       नववर्ष अतिशय शांतपणे आणि साधेपणाने साजरा करा – अनिल देशमुख 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: