मग मशीद कुणी पाडली? ओवेसी

0 67

हैदराबाद – बाबरी मस्जिद  विध्वंस प्रकरणात आज सीबीआयचे विशेष न्यायलयाने आज आपला निर्णय दिला आहे. त्यांनी लाल कृष्ण आडवाणी सह पूर्ण ३२ आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे.या निर्णय साठी कोर्टामध्ये १८ आरोपी उपस्थित होते तर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह आणखी काही आरोपी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली हजेरी कोर्टामध्ये लावली.हे निर्णय २००० पानाचा आहे. या निर्णय मध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे की ही घटना अनियोजित नव्हती. या निर्णय नंतर असदुद्दीन ओविसी यांनी आपली प्रतिकिया देतांना काही प्रश्न उपस्थित केले आहे  ते म्हणाले  जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली?, असा सवाल ओवेसी ने निकाला नंतर उपस्थित केला आहे .   

सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल दिल्यानंतर ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले -सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? २८ आणि  २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे.

Related Posts
1 of 2,057

जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मिळून जाईल, असं यातून दिसतं. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो  असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: