मंदीत संधी.. आयबीपीएस मार्फत बँकेत ११६७ जागांसाठी भरतीची संधी…

0 68
Related Posts
1 of 2,047

कोरोनाच्या महामारीत बेरोजगारीची कुर्हाड अनेकांवर कोसळली आहे. दुसरीकडे बेरोजगारांसाठी भरतीच्या अनेक संधीही चालून येत आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकारी पदांच्या एकूण ११६७ जागा आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (व्यवस्थापन प्रशिक्षण) पदांच्या जागा आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा. उमेदवाराचे वय किमान २० वर्ष व कमाल ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.) अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५/- रुपये आणि इतर मागास प्रवर्ग/ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये परीक्षा शुल्क आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: