भिवंडी दुर्घटनेवरुन कंगनाचा उद्धव ठाकरेंवर टोला , पुलवामा हल्ल्यासोबत केली तुलना !

महाराष्ट्र , मुख्यमंत्री आणि कंगना हा वाद काय मिटताना दिसत नाही . मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईला पाकिस्तान म्हटले होते आणि मुख्यमंत्र्यांवर टीकादेखील केली होती . आता कंगनाने भिवंडी इमारत दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे . तिने म्हटले आहे की, माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्याइतकंच लक्ष भिवंडीमधील पडलेल्या इमारतीवर दिले असते तर ५० लोक वाचले असते.असे म्हणतात तिने या घटनेची तुलना पुलवामा हल्ल्यासोबत केली आहे.
भिवंडी इमारत दुर्घटनेवरून कंगनाने ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्याना सुनावले आहे.तिने पुढे म्हटले आहे – पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान नाही मारले गेले जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचे काय होणार देवालाच माहित.असे ट्विट करत तिने महापालिकेला टॅग केलं आहे.
दरम्यान भिवंडी येथे कोसळलेल्या इमारतीमध्ये ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे .या घटनेत मुत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे .