भिंवडीमध्ये पत्त्यांच्या पानाप्रमाणे अचानक कोसळली इमारत , १० जणांचा मृत्यू !

0 163

मुंबईसारख्या महानगरात इमारती कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत .आज सकाळीदेखील पहाटेच्या सुमारास भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही दुर्दैवी घटना पहाटेच्या सुमारास घडली , इमारतीमधील सर्व लोक झोपेत होते. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर २० जणांना बाहेर काढण्यात आले आहे.ही घटना पहाटे घडल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट मधील ही इमारत कोसळली आहे. एखाद्या पत्त्यांच्या पानाप्रमाणे हि इमारत अचानक जमीनदोस्त झाली आणि सगळीकडे आरडा-ओरड झाली.घटना समजताच एनडीआरएफच्या जवानांची टीम तात्काळ तिथे दाखल झाली आणि बचावकार्यास सुरुवात झाली .

Related Posts
1 of 2,047

माहितीनुसार ही तीन मजली इमारत सुमारे ४३ वर्ष जुनी होती.या इमारतीमध्ये ४० फ्लॅट्स होते ज्यामध्ये जवळ जवळ १५० लोक राहत होती .धक्कादायक म्हणजे कोसळलेली ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: