भिंगार कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवा पुर्ववत सुरु करण्याची आरपीआयची मागणी

0 41

अहमदनगर – भिंगार कॅन्टोमेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल मध्ये कोविड सेंटर सुरु असल्याने मागील तीन ते चार महिन्यापासून इतर रुग्णांसाठी आरोग्यसेवा बंद करण्यात आली आहे.

यामुळे सर्व नागरिकांना खाजगी रुग्णालयात जावे लागत असून, तातडीने सदर कोविड सेंटर इतरत्र हलवून नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवा खुली करुन देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन कॅन्टोमेंटच्या कार्यालयीन अधिक्षक स्नेहा परनाईक यांना देण्यात आले.

भिंगार येथील कॅन्टोमेंटच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल मध्ये नागरिकांची सामान्य वैद्यकीय सेवा, आपत्कालीन सेवा, गरोदर माता तपासणी, प्रसूतिगृह व लहान मुलांचे लसीकरण इत्यादी सेवा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोवीड सेंटरच्या नावाखाली बंद आहेत. कोरोना रुग्णांना सेवा देणे स्वागतार्ह आहे. मात्र सामान्य वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या हिताचा नाही.

कॅन्टोमेंटच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयात जावे लागत असून, त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. टाळेबंदीत अनेकांचा रोजगार बुडाला असून, काहींच्या नोकर्‍या गेल्या आहेत. नागरिकांना रोजचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला असताना सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयात जाणे न परवडणारे आहे. इतर वैद्यकिय सेवा बंद करण्यापेक्षा कॅन्टोमेंटच्या हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटर इतर ठिकाणी हलवून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सेवा खुली करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Related Posts
1 of 1,357

तातडीने कॅन्टोमेंटच्या हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटर इतर ठिकाणी हलवून हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण तपासणी, आंतररुग्ण तपासणी व उपचार तसेच आपत्कालीन उपचार सेवा सुरू करावे, गरोदर माता तपासणी आणि प्रसूतिगृह सुरू करावे, लहान मुलांचे लसीकरण पूर्ववत सुरू करावे, प्रयोगशाळा तपासण्या सुरू करुन क्ष किरण विभाग कार्यान्वीत करावे, एचआईवी एकात्मिक समुपदेशन उपचार केंद्र, क्षयरोग आणि कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम व उपचार केंद्र सुरू करावे, श्‍वानदंश तसेच सर्पदंशावर उपचार सुरू करुन संसर्गजन्य आणि साथीच्या रोगासाठी किमान औषध साठा कायम उपलब्ध ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोविड सेंटर इतरत्र हलवून भिंगार येथील कॅन्टोमेंटचे हॉस्पिटल सर्वसामान्य नागरिकांना खुले करुन होणारी हेळसांड न थाबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी आरपीआय युवकचे शहराध्यक्ष अमित काळे, सनी खरारे, मंगेश मोकळ, तालेवर गोहेर, गौतम कांबळे, संतोष सारसर, नरेंद्र तांबोली, प्रविण वाघमारे, विशाल कटारनवरे, पूजा आळकुटे, राहुल लख्खन आदिंसह नागरिक उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: