भारतीय संसदेचा पावसाळी अधिवेशन सुरु

नवी दिल्ली- भारतीय संसदेचा पावसाळी अधिवेशन आज सुरु झाला कोरोनाच्या प्रभावमुळे या अधिवेशनात कामकाज सकाळी ४ तास आणि संध्याकाळी ४ तास चालणार आहे. या अधिवेशना पूर्वी सर्वच खासदाराची कोरोना चाचणी करण्यात आली आहे .या अधिवेशनात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा हे एकत्र करण्यात आले आहे. हे अधिवेशन शनिवारी आणि रविवारी सुद्धा चालणार आहे. या अधिवेशनच्या सुरवातीला भारताच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुकर्जी तसेच इतर सर्व खासदार जे या काळात मुत्यू झाले त्याना या वेळी श्रद्धांजली देण्यात आली. या अधिवेशनाचा कालावधी १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.
या अधिवेशनात सरकार हे २३ विधायक साधार करणार आहे त्या पैकी ११ हे अध्यादेश असणार आहे. चीनशी सुरू असलेला संघर्ष सीमांवरील सद्यस्थिती करोना साथरोगाची हाताळणी देशाची आर्थिक स्थिती छोटय़ा उद्योगांची बिकट अवस्था विमानतळांचे खासगीकरण पर्यावरणीय प्रभावाचा नवा मसुदा या प्रमुख विषयांवर लोकसभेत व राज्यसभेत चर्चेची मागणी विरोधी पक्ष करत आहेत.
अधिवेशनच्या सुरवात होण्यापूर्वी भारताच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांनी माध्यमाशी संवाद साधला ते म्हणाले – विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. करोना आहे आणि कर्तव्य सुद्धा बजावायचे आहे,खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. यावेळी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज वेगवेगळया वेळी होईल. शनिवार-रविवारी सुद्धा संसदेचे कामकाज होईल. सर्व खासदारांनी हे मान्य केले आहे संपूर्ण देश सैनिकांच्या मागे उभा आहे, असा स्पष्ट संदेश संसदेचे सर्व सदस्य देतील असा आपल्याला विश्वास आहे. जो पर्यंत औषध येत नाही, तो पर्यंत कोणताही निष्काळजीपणा करु नका. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लवकरात लवकर लस निर्मिती व्हावी, हीच आमची इच्छा आहे. आमचे शास्त्रज्ञही यशस्वी ठरले आहेत असे पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले.