भारतीय मुस्लिम जगात सगळ्यात जास्त समाधानी :मोहन भागवत !

0 20

भारत हा विविध जाती धर्मांनी एकवटलेला देश आहे. भारतीय मुस्लिम हे जगात सर्वाधिक समाधानी आहेत असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, भारत हा सगळ्यांचा देश आहे आणि इथे राहण्याचा सर्वांना अधिकार आहे.

ते पुढे म्हणाले ,जेव्हा भारतीय संस्कृतीवर हल्ला झाला तेव्हा सगळ्याच जाती, धर्माचे लोक एकत्र आले आहेत .जेव्हा मुगल शासक अकबर याच्याविरुद्ध जेव्हा महाराणा प्रताप यांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिकांची संख्याही मोठी होती.

Related Posts
1 of 1,388

भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल असं नाही. धर्म हा तोडणारा नाही तर सर्वांना एका समान धाग्यात जोडणारा आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: