‘भारताला तुमच्यासारख्या पंतप्रधानांची गरज’ म्हणत राहुल गांधींकडून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आज २६ सप्टेंबरला माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचा वाढदिवस आहे. हा त्यांचा ८८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त अनेक राजकीय मंडळींनी मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मनमोहन सिंग यांना शुभेच्छा देत म्हटले आहे की -“भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा,” .
२००४ ते २०१४ या कार्यकाळात मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते.ते काँग्रेस चे जेष्ठ नेते आहेत . मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला झाला. पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी ते १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी होते.
दरम्यान आज देशभरातून मनमोहन सिंग यांच्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.