भारतामध्ये चौथी कोरोना प्रतिबंधक लस ; जॉन्सन अँड जॉन्सनशी करार


नवी दिल्ली : कॅव्हॅक्सिन , झायड्स सिव्ही , कोविड शिल्ड आणि आता हैदराबादमधील बायोलॉजिकल ई हि कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन च्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस तयार करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले . जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची मानवी चाचणी संदर्भात दुसरा टप्पा चालू असून लस विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने निधी पुरवावा यासाठी इंडियन व्हॅक्सिन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंस कौन्सिलच्या सदस्यांची भेट घेतली .भारताला ६० कोटी लसीची गरज भासणार असल्याचं स्पष्ट होतंय .